दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे प्रतिपादन व्याख्याते लक्ष्मण जाधव यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदवड येथील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धना बद्दल मार्गदर्शन करताना महाराष्ट्रातील एकमेव असणाऱ्या सह्याद्री वृक्ष बँकची निर्मिती पर्यावरण हिताची भुमिका त्यांनी नमूद केली.यावेळी व्यासपीठावर छञपती संभाजीनगर येथील सह्याद्री वृक्ष बँकेचे सदस्य नितीन भराटे,शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ शेळके,गावचे सरपंच अशोक माने, प्रतिष्ठित नागरिक विनोद पाटील,रेवणनाथ कुचेकर, शिक्षिका अश्विनी चेडे,उमा बोत्रे,स्वाती आष्टेकर,अंगणवाडी कर्मचारी रमण खांडेकर यादी उपस्थित होते.वृक्ष सदैव माणसाच्या साहाय्यालाच असून प्रत्येकाने आपल्या परीने झाडे लावण्याची ती सुरक्षित वाढवण्याची जबाबदारी घ्यावी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली तरच आपण सुखी, समृद्ध जीवन जगू असे मत लक्ष्मण जाधव यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती आष्टेकर यांनी केले.
