दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
इफ्तार पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते असे प्रतिपादन नांदेड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी सोनखेड येथे इफ्तार पार्टीच्या बैठकीत केले.
सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र उपासाचा रमजान महिना सुरू असुन रमजान निमित्त रमजान निमित्त सोनखेड येथे आ.मोहन अण्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, काँग्रेसचे सोनखेड सर्कल प्रमुख प्रकाश मोरे, डॉ. कालीदास मोरे,शफी पठाण,गनीभाई शेख, विलास मोरे, कैलास मोरे, दयानंद येवले, फकिरसाब शेख , अब्दुल रहेमान , आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले की, आपला भारत देश धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रधान देश असुन येथे हिंदू, मुस्लिम, शिख, बौद्ध, जैन आदी धर्माचे व अठरा पगड जातीचे विविध बोली भाषेचे लोक एकत्रीत गुण्यागोविंदाने राहतात एममेकाच्या सुख – दुःखात सहभागी होतात प्रत्येकांच्या सण उत्साहात सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा देतात .
मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र उपासाचा रमजान महिना सुरू आहे त्यानिमित्त सोनखेड येथे पार्टीचे आयोजन करण्यात आले असून आम्ही या इफ्तार पार्टीत सहभागी झाले आहोत मी पवित्र रमजान महिन्यानिमित सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो असे आमदार मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले.
