
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक-ओंकार लव्हेकर
नांदेड
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद नांदेड च्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्यासोबत भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्न शिक्षकांचे सोडविण्यासाठी संघटनात्मक निवेदन देऊन बैठकीमध्ये पुढील मागण्या मांडण्यात आल्या.१). अनेक दिवसा पासून प्रलंबित असलेली महागाई भत्ताची रक्कम माहे- जुनच्या वेतनात जमा करण्यात यावी.२). निवड श्रेणी / चटोपाद्याय आदेश लवकर निर्गर्मीत करण्यात यावे.३). सेवा जेष्ठता आणि गुणवत्तेवर आधारित केंद्रप्रमुखाचे 50% पदे पदोन्नतीने तात्काळ ही पदे समुपदेशन पध्दतीने भरण्यात यावे.४). मुख्यध्यापक पदोनत्ती तात्काळ करुन ती पदे समुपदेशन पध्दतीने भरण्यात यावे.५). प्राथमिक पदविधर शिक्षाकामधून माध्यमिक शिक्षक (विषय गणित) या पदासाठी सेवाश्रेष्टता पदोनतीची प्रकीया करावे.६). विषय शिक्षकाना वेतन श्रेण तात्काळ देण्यात यावी.७). महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलतीस मान्यता देण्यात यावी.८). शिक्षकाची प्रलंबीत असलेली वैद्यकीय प्रतिपुर्तीची बिले तात्काळ मंजूर करण्यात यावी.९).आंतरजिल्हा बदलीने नांदेड जिल्ह्यात अनेक दिवसापासून उपस्थित असलेल्या शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देणे व शाळेवर रुजू करणे.वरील सर्व मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन तात्काळ निकाली काढण्यात यावे.ही शिक्षक संघाच्या वतीने सोडण्यात याव्या. शिक्षणाधिकारीयांनी वरील सर्व प्रश्न कशाप्रकारे निकाल याची सविस्तर चर्चा केली. तसेच येत्या काळामध्ये वरील मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष बाबुराव फसमले, जिल्हा सचिव बाबुराव माडगे, उत्तर सरचिटणीस भगवान गजभारे, दक्षिण प्रवक्ता विश्वेश्वर वडिले, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष डी.डी गायकवाड,दक्षिण जिल्हा संघटक दत्तात्रय मंगनाळे, पाळज बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मणराव सुरकार, शिक्षक परिषदेचे नेते व्यंकटराव गंदपवाड, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रवीण पाटील,शिक्षक नेते सुभाष पानपट्टे, भोकर तालुका सचिव गंगाप्रसाद समुद्रवाड, अर्चना बद्रे, बी. डी गायकवाड सर, नंदकिशोर मुंगळे आदींच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनाचे अभिनंदन मुख्य सल्लागार जीवनराव पाटील वडजे यांनी केले आहे.