
दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव- नवनाथ यादव
महिला बचत गटांना सक्षमीकरणासाठी तांबेवाडी, माणकेश्वर, देवांग्रा, शेकापूर येथे धनादेशाचे वितरण करण्यात आले यामुळे महिलांना आर्थिक बळ मिळणार आहे
धाराशिव: राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. भूम,परंडा व वाशी मतदारसंघातील बचत गटांना प्रत्येकी 11 हजार याप्रमाणे करोडो रुपयाची ची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. बचत गटांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत देण्यात येणार आहे. प्रत्येक गावात जाऊन थेट महिला बचत गटांना धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा दि.१० जून रोजी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.भूम तालुक्यातील तांबेवाडी, माणकेश्वर, देवांग्रा आणि शेकापूर येथील महिला बचत गटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी मतदार संघाचा कायापालट करण्याचा विडा उचलला आहे. विविध विकास कामाच्या माध्यमातून पालकमंत्री सावंत यांनी भूम -परंडा -वाशी मतदारसंघा विकासाची गंगा आणली असुन आरोग्य, पाणी, वीज रस्ते, ग्रामीण भागासह शहरी भागातील विकास कामांना यासह ग्रामस्थांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी छप्पर फाडके निधी देण्यात येत आहे. भूम, परंडा वाशी मतदारसंघातील महिला बचत गटांसाठी पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी आता थेट आर्थिक मदतीचा हात देवू केला आहे.महिला सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.भूम तालुक्यातील तब्बल 2180 बचत गटांसाठी तब्बल 2 कोटी 39 लाखांची मदत देण्यात येणार आहे. प्रत्येक महिला बचत गटांना प्रत्येकी 11 हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे. आर्थिक मदतीमुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार असून पालकमंत्री तानाजीराव सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या या उपक्रमाचे महिलांमधून स्वागत करण्यात येत आहे.तालुक्यातील तांबेवाडी, माणकेश्वर, देवांग्रा आणि शेकापूर या गावातील महिला बचत गटांना प्रत्येकी 11 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख शिवाजी भोईटे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, तालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती उपसभापती बालाजी गुंजाळ, कृउबा सभापती निलेश शेळवणे,संचालक विशाल अंधारे, विशाल ढगे, समाधान सातव, वैभव अंधारे, सरपंच सुभाष देवकते, सरपंच अभिजीत महाजन, सरपंच पिंटू टकले, अरुण शिंदे, आबा जाधवर, पप्पू काकडे आदींसह तांबेवाडी, माणकेश्वर, देवांग्रा, शेकापूर येथील महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.