
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पुणे/पिंपरी चिंचवड:बद्रीनारायण घुगे…
सदन शेतकरी सुधिर गाडे नवनिर्वाचित लोकायुक्त उपसरपंचपदी निवड करण्यात आली लगेच त्याच्या हस्ते
येलवाडी गावातील प्राथमिक शाळे मध्ये जरा हटके कार्यक्रम करून नवगतांचे स्वागत करण्यात आले. ढोल ताश्यांचा खणखणाट , अशा अनुकूल परिस्थितीत बैलगाडी मध्ये बसवून नवगतांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने ,मिरवणूक काडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.परंतु येलवाडी गावचे सरपंच रणजित गाडे ,उपरपंच सुधीर गाडे यांनी यांनी नवगत विध्यार्थ्यांचे बैलगाड्यामध्ये वाजत गाजत मिरवणूक काडून ,खाऊचे वाटप करून भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी जिजाबाई बोत्रे , बळी मोरे , पारू बोत्रे , उल्हास गाडे , हिराबाई बोत्रे , सागर गाडे , बाळासाहेब गाडे , जालिंदर बोत्रे , शिवाजी देवकर ,शिक्षिका वृषाली शेंडे , अंजली कांबळे ,संदीप लगाडे , आणि भाऊराव पांडे आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यानंतर नविनप्रवेश विद्यार्थ्यांना पुस्तक पेन वाटत करण्यात आले.