
दै. चालु वार्ता*वैजापूर प्रतिनिधी, भारत पा.सोनवणे-*
*छत्रपती संभाजीनगर-* मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी गेल्या १० महिन्यांपासून अविरत लढा लढत आहेत. परंतु अजूनही सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सग्यासोयऱ्यांचा कायदा केला नाही. यासह समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या शुक्रवारी शहरातील हर्सूल जकात नाक्याजवळील मधुरा लॉन्स येथे सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.