
दै. चालु वार्ता, नांदेड शहर प्रतिनिधी, प्रा. विजयकुमार दिग्रसक
लोहा-कंधार विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी लोहा-कंधार विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक जनसंपर्क अभियान व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला लोहा-कंधार विधानसभे मध्ये खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांना अधिकचे मताधिक्य दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी नांदेड जिल्हयात प्रत्येक तालुक्यात जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा अंतर्गत आज काटकळंबा तालुका कंधार येथे मतदार आभार व संवाद साधताना,लोहा कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य एकनाथरा मोरे,कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे,लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद पाटील पवार,माजी नगरसेवक शहाजी नळगे,माजी उपनगराध्यक्ष हमीदोदीन मोलीसाब,सुधाकरराव कांबळे,कॉग्रेस शहर अध्यक्ष हमीद भाई सुलेमान,माजी नगरसेवक उत्तम महाबळे,नागोराव पाटील आलेगावकर,सतिश देवकत्ते, दासा पाटील,दत्तात्रय पाटील,घोरबांड एडवोकेट गणेश पवळे कमलाकर पाटील शिंदे उपस्थित कॉग्रेस कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.