
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे/, पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे क्षेत्र देहू येथील. देहू नगरपंचायत वतीने कुषी दिन वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त देहू नगरपंचायतने मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी प्रतिमेचे पूजन करुन हार घालून जयंती साजरी करण्यात आली
वसंतराव नाईक जयंती निमित्त देहू नगरपंचायतने मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी या वेळी प्रतिपादन केले
: १ जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतले. तेंव्हा पासून शासकीय स्तरावर हा दिवस साजरा होतो. तर कृषीदिन ‘थेट शेतकऱ्यांच्या बांधावर’ साजराकरण्याची अभिनव प्रथा सन २०११ पासून ‘थेट शेतकऱ्यांच्या बांधावर’ मोहीमेचे प्रणेते एकनाथ पवार यांनी सुरू केली. वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले.
वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होते. नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी झाला. वसंतराव नाईक हरितक्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी “वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत.” या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या. महानायक वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्य प्रश्नांचीच जाणीव नव्हती तर, दूरगामी स्वरुपाच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी केल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती. कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’, ‘हरितयोद्धा’ म्हणून संबोधतात. प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी ‘आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत’ या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. महानायक वसंतराव नाईक हे एक केवळ नाव नसून शाश्वत विकासाची एक लोकाभिमुख विचारधारा आहे. असे बोलले आहे
या वेळी देहू नगरपंचायत चे नगराध्यक्षा सौ पुजा दिवटे व नगरसेवक योगेश काळोखे प्रविण काळोखे योगेश परंडवाल मयुर शिवशरण प्रकाशहगवणे बांधकाम अधिकारी संगपाल गायकवाड अक्षय रोकडे आंधळे ज्ञानेश्वर निकम सर्व कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते