
मायणी भाग शिक्षण प्रसारक चे कमलेश्वअर विद्या मंदिर विखले हायस्कूल माजी विद्यार्थी १९८६-८७ वर्ग पहिले स्नेह संमेलन ६ नोव्हेंबर २०२४ रोजी विखले येथे पार पडले
हे स्नेह संमेलन करायचे आम्ही गेले २ वर्ष प्रयत्न करीत होतो अगदी अवघड काम होते. कारण ४० ते ४५ माजी विद्यार्थांचा आणि आम्हांला द्न्यानदान करणारे शिक्षक यांच्याशी संपर्क होणे. परंतु या मोबाइल वरील व्हाट्सअप दुनियेत ते अखेर शक्य झाले
३६ वर्षांनी आम्ही मित्र भेटणार यांची कल्पना आम्हाला भारी वाटली. एवढ्या वर्षां नंतर कोण कसे दिसत असेल त्यांचे चेहरे , त्यांच्या सवयी सगळे वेगळेच होते.
सकाळी 10 वाजलेपासून आम्ही एक एक करीत शाळेच्या आवारात जमा होत होतो. भेटून एवढा आनंद झाला की शब्दात सांगणं कठीण
आमचे स्नेह संमेलन दीप प्रज्वलन करून सुरवात झाली. प्रथमतः आम्ही आमच्या काही विद्यार्थी हे जग सोडून गेले त्यानां श्रध्दांजली वाहिली.
आमच्या शिक्षकांचे मिरासदार सर , डी बी देशमुख सर , भंडारे सर , दिवटे सर , महामुनी सर यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांचे मनोगत झाले. काही विद्यार्थांचा मनोगत झाले.
मध्येच आमचा एक मित्र कुलकर्णी यांचे मिमिक्री म्हणजे विविध पक्षांचे आवाज काढून दाखवले अतिशय आनंद वाटला की आमच्या मध्येच एक कलाकार होता.
त्यानंतर सर्वांच्या गप्पा रंगल्या, जुन्या शालेय आयुषतील आठवणी एकूण खूप आनंद वाटला.
अखेर आमच्या वर्ग मित्र सुनीता मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. आणि फोटो शेषन झाले. शेवटी आम्हीं सर्व एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतलो.
स्नेहसंमेलनाचे नियोजन :- शांताराम घाडगे, बाबासाहेब कटरे, मधुकर देशमुख, महादेव देशमुख, ईश्वर निकम, सुनिता थोरात, संपत काटकर ,राजाराम घाडगे यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला.
सूत्रसंचालन :- अशोक घाडगे यांनी केले.