
गुरु नानक जयंतीनिमित्त आज शेअर बाजार बंद राहणार आहे. संध्याकाळी शेअर बाजाराचं एक सत्र आज सुरू राहणार आहे. आता पुढील आठवड्यात सोमवार 18 नोव्हेंबर 2024 रोजी इक्विटी मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू होईल.
पुढील आठवड्यात आणखी एक दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे.
20 नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. लोकांना मतदान करता यावं म्हणून सुट्टी दिली आहे. या निमित्ताने बँका आणि शेअर मार्केट बंद राहणार आहे.
20 नोव्हेंबर रोजी कमोडिटी मार्केट सकाळच्या सत्रात बंद राहणार आहे. संध्याकाळच्या सत्रात म्हणजे 5 ते 11:30/11:55 पर्यंत सुरू राहील.
आठवडाभर सलग शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू आहे. आता सलग तीन दिवस मार्केट बंद असल्यानं या घसरणीला ब्रेक लागू शकतो असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा रिकव्हरी मोड दिसेल अशी अपेक्षा आहे.
सलग 6 दिवस विक्रीच्या दबावामुळे, देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 सुमारे 4 टक्क्यांनी घसरले आहेत. बाजाराच्या या गोंधळाच्या वातावरणात, BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 6 दिवसांत 21.98 लाख कोटी रुपयांनी कमी झालं, याचा अर्थ गुंतवणूकदारांचे 21.98 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं.