भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या ठाकुरांना हॉटेलमध्ये घेरून पैसे वाटप केल्याच आरोप केला आहे. या आरोपासह ठाकुरांनी विनोद तावडे यांना हॉटेलमध्ये घेरलं होतं.
तसेच त्यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डांबून ठेवल्याचा आरोप होत होता. तब्बल तीन तास विरारच्या हॉटेलमध्ये हा संपूर्ण राडा सूरू होता. या राड्यानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकुरांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली आहे. पण पत्रकार परिषदेत आता भलतचं घडलं आहे.
बहुजन विकास आघाडीच्या हॉटेलमधील राड्यानंतर हितेंद्र ठाकुर आणि विनोद तावडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत ठाकुर म्हणाले की, तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितीज त्यांना काका बोलतो, असे ठाकुर सूरूवातीला म्हणाले. तावडे साहेब तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं,सर्व्हेमध्ये नालासोपोराची ही सीट झिरो आहे, त्यामुळे कोणीच नेते आले नाही, त्यामुळे तुम्हाला बोलावून घेतले. तसेच या हॉटेलच्या रूममध्ये 10 लाख रूपये सापडले आहेत. मग हे पैसे कोणाचे आहेत? असा सवाल हितेंद्र ठाकुरांनी उपस्थित केला आहे. या दरम्यान क्षितीज ठाकूर आकडे डिक्लेअर करायची धमकी देताना दिसला.
ठाकुरांनंतर विनोद तावडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. निवडणुक आचारसंहितेबाबत काय काय काळजी घ्यावी याविषयी मी माहिती दिलेली आहे. वास्तव आम्ही सांगितलं आहे आणि ठाकुरांनी आपली बाजू सांगितली आहे,असे म्हणत विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया आटोपती घेतली.
विरारमध्ये नेमकं काय घडलं?
क्षितीज ठाकूरांसह बविआ कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घूसून विनोद तावडे यांनी घेरलं आहे.तसेच यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले होते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिफाफे उघडून पैसे दाखवल्याचा झाला होता.त्याचसोबत या बॅगेतून लॅपटॉप आणि काही डायऱ्या देखील सापडल्या आहेत. हे संपूर्ण दस्तावेज ताब्यात घेऊन आता क्षितीज ठाकुरांनी विनोद तावडेंवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते घटनास्थळी दाखर झाले आहेत.तसेच भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.
