विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना जास्तच चर्चेत आली. आधी सरसकट पैसे खात्यावर जमा होत होते. मात्र त्यानंतर एक एक तक्रारी पुढे आल्या आणि कारवाईला सुरुवात झाली. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची ज्या भागातून तक्रारी आल्या तिथे फेरतपासणी करण्यात आली.
4 लाख महिलांनी अर्जाचा लाभ नको म्हणून वसूलीच्या भीतीनं आधीच माघार घेतली.
लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून कोणताही दंड वसूल केला जात नसल्याचं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. मात्र ज्यांनी खोटी माहिती दिली त्यांच्याकडून मिळालेली रक्कम सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करून घेतली जाणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे लाडक्या बहिणींना चांगलाच धक्का बसला आहे.
खोटी माहिती देऊन जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. साडेचार लाख महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत. अजूनही वेळ आहे, ज्यांनी खोटी माहिती दिली त्यांनी स्वत:हून पुढे यावं आणि अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं. सरकारची स्वत: ची स्वतंत्र पडताळणी व्यवस्था आहे. त्या अंतर्गत आम्ही परवहन विभाग आणि आयकर विभागाकडून माहिती घेऊन पडताळणी करत आहोत.
ज्या महिलांनी निकषांत बसत नसतानाही या योजनेचा लाभ घेतला त्यांच्या अर्जाची स्वतंत्र पडताळणी केली जाणार आहे. ज्या महिला लग्न करुन राज्याबाहेर गेल्या आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तरीही या योजनेच्या निकषात बसणार नाहीत असंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.
