दैनिक चालु वार्ता शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
शिरूर( पुणे ) शिंदोडी तालुका शिरूर येथील गट नंबर २३ हा गायरान गट नंबर आहे . त्याचे एकूण क्षेत्र २-६५ आर शिंदोडी ग्रामपंचायत च्या ताब्यात आहे. परंतु महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने सन १९८९ ते ९० च्या दरम्यान जागा अधिग्रहण केली. अधिग्रहण केली ती जागा गट क्रमांक २४ आहे त्या ठिकाणी एमआयडीसीच्या नावे ०/४१ आर क्षेत्र असताना त्यांनी आपले जॅकवेल औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कोणाची परवानगी नसताना गट क्रमांक २३ मध्ये उभारले आहे आहे . त्यानंतर संपूर्ण गायरान क्षेत्राला कसली परवानगी नसताना कंपाउंड मारले आहे. या गायरान क्षेत्रामध्ये शिंदोडी ग्रामस्थांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम होत असतो त्यामुळे प्रचंड अडचणी येऊ लागल्या . तेव्हा जागेच्या पाहणी करण्याकरता . जुने दप्तर तपासण्यात आले. त्यावेळेस शिंदोडी गावचे सरपंच अरुणराव दौलत खेडकर, उपसरपंच सिंधुताई इंद्रभान ओव्हाळ व इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या हे निदर्शनात आले की आपल्या जागेवर एमआयडीसी ने ताबा घेतला आहे. सन २०२१ पासून ग्रामपंचायत ने जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी पत्रव्यवहार करून एमआयडीसी ने आमच्या सर्वच गायरान क्षेत्रावर कसलाही आदेश नसताना त्यावर कंपाउंड मारून ताबा घेतलेला आहे. असे निदर्शनास आणून दिले.आमच्या गावाला कसले गायरान क्षेत्र ठेवलेले नाही. एमआयडीसी ने गट नंबर २४ मध्ये ४१ आर जागा अधिग्रहण केली असताना सुद्धा . आमच्या गावचे गायरान बळजबरीने ताब्यात घेऊन ती त्यांच्या अधिकाराखाली ,अधिकार नसताना सुद्धा कोणाला हि त्या ठिकाणी इलेक्ट्रिक सब स्टेशन, इलेक्ट्रिक मोटर बसवण्याच्या परवानगी, देत आहे. आणि त्या क्षेत्रातून अनाधिकृत मुरूम चोरी झाली हा तर फार संशोधनाचा भाग आहे.
आमच्या गावचा दशक्रिया विधी त्या ठिकाणी होत आहे. परंतु आम्हाला त्या ठिकाणी कसली जागा एमआयडीसी ने ठेवली नाही. त्यामुळे दशक्रिया विधी करण्यात अडथळा येत आहे. गट नंबर २३ मध्ये पिढ्यान पिढी पार सांजोबा देवस्थान असून त्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा रस्ता ठेवला नाही. पण १९९० पासून आमच्या गावातून एमआयडीसी ने पाणीपुरवठा औद्योगिक वसाहतीला दिला आहे . धरण क्षेत्रात आमच्या जमिनी जाऊन गावातील कोणताही विद्यार्थी व युवकला एमआयडीसी ने कामावर घेतलेले नाही . परंतु एमआयडीसी ने आमच्या गायरानाचा मात्र कसलाही आदेश नसताना ताबा घेतला आहे .
हे अतिक्रमण त्वरित काढावे अन्यथा सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.
शिंदोडी ग्रामपंचायत ने पाच ते सहा वेळा माननीय जिल्हाधिकारी पुणे, तहसीलदार कार्यालय शिरूर, माननीय उप अभियंता स्थापत्य रांजणगाव गणपती विभाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु त्यास कसलीही दाद दिली जात नाही
अरुण दौलतराव खेडकर सरपंच ग्रामपंचायत शिंदोडी.
सिंधुताई इंद्रभान ओव्हाळ उपसरपंच ग्रामपंचायत शिंदोडी.
