
भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर…
राज्यात काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. भाजपाने या निवडणुकांची तयारी सुरू केली असून संघटनात्मक बदल केले आहेत. राज्यातील जिल्हाध्यक्षांची नवीन यादी जाहीर केली आहे.
या यादीत ८१ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, मुंबई जिल्हाध्यक्षपदी आमदार आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे. मुंबई जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार प्रवीण दरेकर प्रबळ दावेदार होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महाराष्ट्र भाजपाने संघटनात्मक फेरबदल केले आहेत. विधानसबा निवडणुकीनंतर सदस्य नोंदणीची मोहिम राबवण्यात आली होती. यानंतर मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुका केल्या. दरम्यान, भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईसाठी आमदार आशिष शेलार यांच्या नावाची घोषणा तर छत्रपती संभाजीनगरसाठी शिरीष बोराळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबईतील अध्यक्षांची नावे
उत्तर मुंबई- दीपक तावडे, उत्तर पश्चिम मुंबई- संतोष मेढेकर, उत्तर पूर्व मुंबई- दीपक दळवी, उत्तर मध्य मुंबई- विरेंद्र म्हात्रे, दक्षिण मध्य मुंबई- राजेश शिरवडकर, दक्षिण मुंबई- शरद चिंतनकरस मुंबई-आमदार आशिष शेलार.
छत्रपती संभाजीनगर
छ.संभाजीनगर शहर-शिरीष बोराळकर, छ.संभाजीनगर उत्तर- सुहास शिरसाठ, छ.संभाजीनगर पश्चिम- संजय खंबायते.