दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी -बापू बोराटे
पुणे (इंदापूर):- तालुक्यातील शेटफळ हवेली येथील धारिका दूध संकलन केंद्र यांच्या वतीने गाय,म्हैस यांच्या अधिक दूध वाढीसाठी चर्चासत्र त्याचबरोबर गोठा व्यवस्थापन, गाय व म्हैस यांच्यामधील येणाऱ्या आजारांवर उपाय आणि आपल्या गाय, म्हैस कशा राहतील याविषयी नेचर डिलाईट यांच्या सहकार्याने हे चर्चासत्र आयोजन करण्यात आले होते. या चर्चा सत्रासाठी शेटफळ हवेली व आजूबाजूच्या परिसरातील दूध उत्पादकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती.
या चर्चासत्रासाठी मार्गदर्शन करण्यासाठी नेचर डिलाईट कॅटल फिड्सचे विस्तार व्यवस्थापक डॉ.सचिन रुपनवर,(ASM)नेचर डिलाईट कॅटल फीड्स रामदास माने, तसेच संकलन अधिकारी नेचर डिलाईट डेअरी चे दत्तात्रय जानकर हे उपस्थित होते.
देशभरातील अनेक शेतकरी शेती सोबत अनेक जोड व्यवसाय करीत असतात. त्यात प्रामुख्याने दूध व्यवसाय हा देखील मोठ्या प्रमाणात केला जात असतो. पण अनेक शेतकऱ्यांचे अचूक नियोजन नसल्याने दूध व्यवसायात देखील अनेकदा तोटा होत असतो. या व्यवसायात सरकारसुद्धा विविध अनुदाने आणि योजनांमार्फत शेतकऱ्यांना मदत करत असते. परंतु, दूध व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना देखील सामोरे जावे लागते. त्यातील सर्वात मोठी आणि मुख्य अडचण म्हणजे गायी आणि म्हशींचे दूध कमी येणे. यामुळे दुग्धउत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.
दरम्यान जनावरांमध्ये होणारी दुधाची घट टाळण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करता येतात. बऱ्याचदा शेतकरी दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी जनावरांना इंजेक्शन किंवा इतर औषधे दिली जातात. यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि हे दूध सेवन करणे सुद्धा धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जनावरांच्या दूध वाढीसाठी नैसर्गिक उपाय करणे आवश्यक आहे.
अशा विविध उपयुक्त माहिती वरती या चर्चासत्रामध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी दूध उत्पादकांनी विचारलेल्या आपल्या विविध समस्यांवरती ही यावेळी या चर्चासत्रामध्ये योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. या चर्चासत्रानंतर धारिका दूध संकलन केंद्राच्या वतीने आलेल्या सर्वच दूध उत्पादकांसाठी स्नेहभोजन चे आयोजन करण्यात आले होते.
अशी चर्चासत्र धारिका दूध संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती धारिका दूध संकलन केंद्राचे व्यवस्थापक स्वप्निल शिंदे व सोमनाथ सावंत यांनी सांगितले.
नेचर डिलाईट पशुखाद्य गायी आणि म्हशींसाठी उत्तम आहे
आजकाल तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे पशुखाद्य पाहायला मिळतील, त्यातील एक म्हणजे नेचर डिलाईट, जी गाय किंवा म्हशीला खाल्ली तर जास्त दूध मिळते.नेचर डिलाईट पशुखाद्यात अशी अनेक पोषक तत्वे आहेत ज्यामुळे गायी आणि म्हशींची उत्पादकता वाढते आणि त्या कमी प्रमाणातही जास्त दूध देतात.चांगल्या परिणामांसाठी, ते कोरडे करणे चांगले आहे; गाई किंवा म्हशीला देण्यापूर्वी ते पाण्यात भिजवू नका.


