
दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनीधी): सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): पाटोदा तालुक्यातील चिंचोली येथील श्री.क्षेत्र गहिनीनाथ गड संस्थान, येथे एक विशेष आणि भाविकतेने भरलेला धार्मिक सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात परमपूज्य महंत ह.भ.प.श्री विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.आ. भिमरावजी धोंडे साहेब यांच्या वतीने गड संस्थानला मानाचे दोन पांढरे शुभ्र अश्व (घोडे) विधीवत पूजेसह अर्पण करण्यात आले. या वेळी युवा नेते डॉ अजय दादा धोंडे, जि.प. सदस्य रामराव खेडकर, जि.प. सदस्य रामदास बडे, पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, माजी सभापती अनिल जायभाये, आरपीआयचे आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळवे, युवा नेते आस्ताक भाई शेख, माजी उपसभापती देविदास शेंडगे, सरपंच तात्यासाहेब लाड, सरपंच जालिंदर सांगळे, माजी सरपंच बाळासाहेब पवार, माजी सरपंच भागवत वारे, दिलीप म्हस्के फौजी, काकासाहेब लांडरुढ, अभिलाष गाडेकर पाटील, या पवित्र कार्यासाठी विविध भागांतून आलेले भाविक, भक्तगण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक विधी, पूजन व मंत्रोच्चारांच्या गजरात घोड्यांचे स्वागत करण्यात आले.