
पत्रकार परिषदेपूर्वी अजित पवारांची फटकेबाजी !
राज्यातील कोरोनाची स्थिती, पालखी सोहळण्याचे नियोजन याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि. १४ जून) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. पण पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी चॅनेलचे बूम खूप वर आल्याने, ‘दांडकं पार माझ्यावर चाललंय…
जरा खाली घेत चला (बुम). माझा चेहरा दिसेल’, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली.
कोरोना संख्येत वाढ, सरकार अलर्ट मोडवर
त्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पावर यांनी, वाढत्या कोरोनामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले. कोरोना पार्श्वभूमीवर बैठक घेतली. सगळे नियंत्रणात आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. काल ४ रुग्णांचा मृत्यू झाला. सरकार अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.
वारी आणि पालखी मार्गाचा आढावा घेतला
आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारी आणि पालखी मार्गाचा आढावा घेतला. यासाठी नियोजन केले आहे. शेतीचे कामे लवकर आटोपल्याने वारीमध्ये शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी राज्याच्या प्रमुखांनी बैठक घेतली. मीदेखील बैठक घेतली. पालखी मार्गाच्या कामासाठी सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. दिवे घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. वारी दरम्यान पोलिसांना हद्दीबाहेर काम कण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी भाष्य केले. विमान अपघाताच्या विषयात आमचा शत्रू पाकिस्तान बरळत आहे, असेही ते म्हणाले.