
भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी. पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. यात दर चार महिन्यांनी २००० रुपये दिले जातात.
दरम्यान, आता जून महिन्यात हे पैसे दिले जाणार आहेत.२० जून रोजी हे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. या योजनेत आता काही शेतकऱ्यांना ४००० रुपये दिले जाणार आहेत.
पीएम किसान योजनेत या महिन्यात शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार आहे. त्यांच्या खात्यात २००० रुपये दिले जातात. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांसाठी मदत व्हावी, म्हणून हे पैसे दिले जातात. दरम्यान, या राज्यातील शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळणार आहेत.
या शेतकऱ्यांना मिळणार डबल फायदा
मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना डबल फायदा मिळणार आहे. मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत २००० रुपये दिले जातात. तसेच या राज्याती मुख्यमंत्री कल्याण योजनेअंतर्गत २००० रुपये दिले गेले होते. या योजनेत शेतकऱ्यांना केंद्राकडून ६००० रुपये आणि राज्य सरकारकडून ६००० रुपये दिले जातात.
२०वा हप्ता लवकरच मिळणार
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. २० जानेवारी रोजी हे पैसे खात्यात जमा केले जाणार आहेत. याआधीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जातो. त्यानंतर आता पुढचा हप्ता दिला जाणार आहे.