
आळंदी आज संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. मात्र पहाटे पासून आळंदी पंचक्रोशीत पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
धुमशान बरसत असलेल्या पावासामुळे भाविकांचे हाल होत असून जागा भेटेल तिथे आसरा घेत वारकरी पावसापासून आपला बचाव करताना दिसत आहेत.अगोदर दर्शनबारी उभारण्यात आलेला भक्ती – सोपान पुल पाण्याखाली गेला आहे.
यामुळे अगोदरच याची सतर्कता बाळगत प्रशासनाने स्कायवॉक वरून दर्शन बारी वळविण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला असल्याचे मत आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ यांनी व्यक्त केले आहे.
मावळातील जाधववाडी तलाव शंभर टक्के भरला असून यातून इंद्रायणी नदी पात्रात विसर्ग करण्यात येणार आहे.यामुळे इंद्रायणीची पाणी पातळी वाढणार आहे.अशावेळी देहू आणि आळंदीतील भाविकांनी इंद्रायणी नदी पात्रात जाऊ नये असा इशारा पाठबंधारे विभागाने दिला आहे.आळंदीत देखील मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भाविकांना सूचना देत पाण्यात न पाण्याची विनंती केली आहे.
पोलिस प्रशासनाच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर अधिकचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जीवरक्षक पाण्यात तैनात करण्यात आले आहेत. नदीपात्रात दोन बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.