
शरद पवार यांचे मोठे विधान !
बारामती: राज्याच्या राजकारणात सध्या पालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये स्वबळावर लढण्याच्या हालचाली सुरु असतानाच मविआमध्ये मात्र अद्याप शांतता आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र राहणार की घटक पक्ष स्वबळावर लढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबतच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
काय म्हणालेत शरद पवार?
‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तीन महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरु होईल. आम्ही सगळे त्यात सहभागी होऊ, मविआने एकत्रित निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, मात्र आम्ही सर्वजण आमची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना, शेतकरी पक्ष सर्व जण बसून निर्णय घेऊ. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचे शक्ती स्थान जास्त आहे त्यांना त्यात विचारात घ्याव लागेल, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
“हिंदीची सक्ती असू नये, मात्र हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. पालकांच्या मागणीप्रमाणे निर्णय घ्यावा पण सक्ती नको. संपूर्ण भारतात 70-75 टक्के लोक हिंदी बोलतात, याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही, मात्र सक्ती नको,” असे म्हणत शरद पवार यांनी सध्या सुरु असलेल्या हिंदी भाषेच्या वादावरुनही महत्त्वाचे विधान केले.
दरम्यान, “माळेगांव कारखाना निवडणूक अजित पवार तळ ठोकून बसलेत.लोकसभेची निवडणूक वेळी वेल्हा बँक अशीच रात्री बारा पर्यंत उघडी होती. आता ही दुसरी वेळ आहे. बँक कशाला उघडेल? त्याचे नेतृत्व करणाऱ्यांनी सूचना केल्याशिवाय कर्मचारी कशाला उघडतील. एवढी रात्री सेवा द्यावी अशी स्थिती बारामतीत नाही, त्यामुळे काय समजायचे ते समजा…” असा टोलाही शरद पवार यांनी लगावला…