
संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल !
यांचा पक्ष गुजरातमध्ये स्थापन झाला आणि अमित शाह यांचे पक्षप्रमुख, मग बाळासाहेबांचा फोटो का लावता? असा घणाघात संजय राऊत यांनी आज शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात एकनाथ शिंदेंवर केला.
तसंच पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्धबंदी सरेंडर होण्याचं काम नरेंदर आणि देवेंदर यांचं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला.
वर्धापनदिनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; दोन नेते सोडणार साथ
आज शिवसेनेचा वर्धापनदिन आहे, कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. फक्त विचार देण्याचा कार्यक्रम आहे. रोज काहीतरी नवीन देत असलेल्या सरकारने मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. कुणीतरी एक मंत्री अघोरी विद्या करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा हॉरर सिनेमा आपण सर्वांनी पाहिला. या चित्रपटाच्या निर्मात्याटागी कार्यक्रम सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला.
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं रोपटं नाही. तर झाड लावलं होतं. या झाडाला ५९ वर्षे पूर्ण होत असून हा देशातील चमत्कार आहे. शिवसेनेला सातत्याने बाळासाहेबांनी विचार देण्याचा कार्यक्रम दिला. बाळासाहेबांनी या शिवसेनेची स्थापना केली आहे. मात्र ज्यांचा जन्म दोन वर्षापूर्वी झाला. त्यांनाही वाटत आहे की, त्यांना आपण ५९ वर्षांचं झाल्यासारखं वाटतं. त्यांचा स्थापना दिवस सूरतला झाला पाहिजे.
तुमच्या पक्षाची स्थापना गुजरातमध्ये झाला. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्या पक्षासाठी स्पॉन्सरशिप करावी. तरीही भारतात दोनच सेना राहतील. एक शिवसेना आणि दुसरी भारतीय सेना. वाघ शरण जात नाहीत. गवत खात नाहीत आणि हे वाघ अमित शहा यांचं गवत खात आहेत.
भारतातील अनेक पक्ष शिवसेनेच्या स्थापनेनंतर जन्माला आले आहेत. या काळात शिवसेनेने अनेक तुफान झेलले आहेत. आमचा संघर्ष संपलेला नाही. ज्या माणसांना आम्ही सरदार केलं त्या सरदारांनी आमच्या पाठित खंजिर खुपसला आहे. तरीही शिवसेना झुकली नाही की कोणाच्या चरणी बसली आहे. माभ एक ट्रम्पचा फोन येतो आणि ते सरेंडर होतात. सरेंडर होण्याचं काम नरेंदर आणि देवेंदर यांचं आहे, टीकाही संजय राऊत यांनी केली.