
CM फडणवीसांनी एकच शब्दा वापरला अन्…
शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त मुंबईत उद्धव ठाकरेंची सभा झाली. या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या टीके दरम्यान त्यांनी आपला पक्ष आणि मनसेच्या युतीबाबत बोलताना राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्या हाॅटेलमध्ये झालेल्या भेटीवरून फडणवीसांना टार्गेट केले.
ते म्हणाले, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागले.
या टीकेला फडणवीस काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता होती. ते आज (शुक्रवार) जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना ठाकरेंनी केलेल्या टीके विषयी विचारले असता त्यांनी अवघा एक शब्द उच्चारला ‘बोल बच्चन’. फडणवीस म्हणाले, बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही.
काहीही झालं तरी मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात घेणारच आहोत. मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार. मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणून मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. म्हणून शेठजीचे नोकर प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सभेत देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला होता.
चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंवर थेट बोलणे मुख्यमंत्री फडणवीसांनी टाळले असले तरी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की. मोदीजी-अमितभाई- देवेंद्रजी यांच्यावर वैयक्तिक आरोप करणं सोपं आहे, पण हे नेते जेव्हा देशभर,राज्यभर दौरे करत होते, तेव्हा उद्धवजी मातोश्रीतून ऑनलाईन भाषण करत होते. हे महाराष्ट्रातील जनतेनं बघितलेलं आहे.’शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात.
एकनाथ शिंदेंकडून टार्गेट
एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत यांना गाठून टाकले आहे. युती करता युती करता का असे म्हणत ते मनसेसोबत युतीसाठी लाचार झाले आहेत.बाळासाहेबांचा ज्या काँग्रेसला विरोध होता त्यांनी त्या काँग्रेसकडे शिवसेना गहान टाकली होती, असे देखील शिंदे म्हणाले.
नाशिकमध्ये भाजपच्या नेत्यांकडून सावकारी, दुपटीने वसुलीसाठी कर्जदारांचा होतोय छळ !