
माळेगाव साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीत पहाटे साडेचार वाजता संपलेल्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीच्या अखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलला अ वर्ग गटातून 16 जागांची आघाडी तर सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या 4 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
दरम्यान ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड निश्चित आहे.
माळेगाव साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार अनुक्रमे अनुसूचित जाती जमाती मधील रतनकुमार भोसले व भटक्या विमुक्त जाती जमातीतील विलास ऋषिकांत देवकाते तसेच ओबीसी प्रवर्गातील नितीन शेंडे हे आघाडीवर आहेत.
दरम्यान पहिल्या फेरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे 16 उमेदवार आघाडीवर आहेत तर तावरे गुरु शिष्य यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत, यामध्ये सांगवी गटातून स्वतः चंद्रराव तावरे तसेच त्याच गटातून रणजीत खलाटे बारामती गटातून नेताजी गवारे आणि महिला राखीव गटातून राजश्री कोकरे आघाडीवर असल्याचे चित्र आहे,अद्याप दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असून यामध्ये काही बदल घडतील का याची उत्सुकता लागून राहिली आहे.