
हिंदी भाषा सक्तीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया !
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदी भाषा सक्तीला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. हिंदी भाषा सक्तीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
भाषिक आणीबाणी आम्ही स्वीकारणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले तर ५ मिनिटांत हा विषय संपेल. आम्हाला हिंदी भाषेचा द्वेष नाही पण हिंदी सक्तीला आमचा विरोध राहिल.’, असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडले.