
मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो !
राज्यात सध्या प्राथमिक शिक्षणातील हिंदी सक्तीविरोधातून राजकीय वातावरण कमालीचे तापलं आहे. या मुद्यावर आता ५ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे.
याला उद्धव ठाकरेंनीही पाठिंबा दर्शवला आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान हिंदी सक्तीविरोधात मनसेने मुंबईत लावलेल्या बॅनवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटा लावण्यात आला आहे. हे बॅनर आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
हिंदी सक्तीवर महायुती सरकारमध्ये मतभेद?
हिंदीवरून महायुती सरकारमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. राज्यात प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषा सक्ती नाही, आम्ही अनिवार्य असा शब्द हटवला आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तर प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती नकोच, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे आता हिंदी सक्तीच्या मुद्यावर महायुतीमधील मतभेद समोर आले आहेत.
मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचे फोटो आणि हिंदी भाषेबाबचे मत
प्राथमिक शिक्षणात तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकविण्यास मनसेने तीव्र विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही केले आहे. मनसेने दादरमध्ये हिंदी भाषा सक्तीविरोधात एक बॅनर लावले आहे. या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो लावण्यात आला आहे. “इयत्ता पाचवीपर्यंत मुलांनी मातृभाषेतच शिकावं, इतर कोणत्याही भाषेत शिकु नये. कोणत्याही भाषेला आपला विरोध नाही. पंरतु लहान वायत मुलांचा तीन भाषांचं ओझं लादणं बरोबर नाही.” असे अजित पवारांचे मतही या बॅनरवर लावण्यात आला आहे. मुंबईचे उपशहराध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी हा बॅनर लावला आहे. या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो असून, ५ जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मनसेच्या बॅनरवर राज ठाकरे यांच्याबरोबर थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटा झळकल्याने हा मुद्या आता राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
राज्यात हिंदी सक्तीला होणार्या विरोध पाहता मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बैठक घेतली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, “मला असं वाटतं प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषा असू नये. पहिलीपासून मराठी भाषा असावी. पहिलीपासून मराठी भाषा लिहायला आणि वाचायला मुले शिकतात तेव्हा त्यांना हिंदी भाषा देखील लिहिता वाचता येते. फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून सुरुवात केली तरी काही हरकत नाही. हिंदी भाषा ही इयत्ता पाचवीपासून शिकवली जावी.