
दैनिक चालू वार्ता वर्धा – उपसंपादक- अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आष्टी तालुका शाखेच्या वतीने एका गरीब कुटुंबातील मुलीचा स्वखर्चाने विवाह पार पाडून दिला सविस्तर वृत असे की,तालुक्यातील किन्ही हरिलाल उईके यांची कन्या कल्पना आणि कारंजा(घा) तालुक्यातील कन्नमवारग्राम रहिवासी महादेव कोवे यांचा मुलगा गुलशन यांचे सोबत लावून दिले यात असे की, वधू पिता हरिलाल कोवे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने मुलीचे लग्न कसे करावे या विवंचनेत असताना शिवसेना कार्यकर्ता अनिल धुर्वे यांच्या लक्षात सदर प्रकार आल्यानंतर त्यांनी तालुका शिवसेनाप्रमुख अनिल गुरव यांना सदर विवाह समस्याग्रस्त कुटुंबाची भेट करून दिली आणि सर्व शिवसेनेच्या शाखा कार्यकर्त्यांना बोलावून विवाहाची तयारी केली आणि थाटात विवाह पार पाडून दिला यात उपस्थित पाहुण्यांना जेवण दिले सदर विवाह २५ जून २५ रोजी बुधवारला पार पडला या मंगल प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल गुरव यांच्यासह अजय खानजोडे, सुरेश टरके, अमरसिंग चव्हाण, अनिल देशमुख, विनायक हेडाऊ, शैलेश अकोलकर, अनिल धुर्वे, विशाल कुकडे, प्रफुल समुद्रे, प्रवीण नेरकर, शेखर राणे, हरीश लाड,लोकेश पोहेकर, प्रमोद कडू, नानकसिंग बावरी, सुरेश ढबाले यांची उपस्थिती होती सदर विवाहास विशेष सहकार्य पत्रकार अमोल सोटे,अमोल तायवाडे यांचे लाभले.