दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा लाखो वैष्णव भक्तांसह पालखी सोहळा पुणे जिल्यातील शेवटच्या मुक्कामी इंदापूर तालुक्यातील सराटी येथे शनिवारी ३० जून रोजी विसावला. मंगळवारी पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करून अकलूजच्या दिशेने पुढे गेल्यानंतर १२५ आरोग्य दूतांनी मुक्कामाचे ठिकाण, गावातील प्रमुख रस्ते, आणि परिसर काही तासात स्वच्छ केला.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जी.आय. एस. वर्ल्ड हॉस्पिलिटी सर्व्हिसेस या संस्थेला वारीच्या वाटेवरील स्वच्छता करण्याचे काम दिले आहे. रविराज लाय गुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी काम करत आहे. व्यवस्थापक विश्राम कुलकर्णी आणि सह व्यवस्थापक बंडू काशीद व सह व्यवस्थापक रेखा जाधव यांच्यासह १२५ आरोग्य सेवकांनी सराटी गावातील प्लास्टिकचे ग्लास,बाटल्या, पंतरवाळ्या कागदी डिश व इतर अस्ताव्यस्त पडलेल्या कचरा या संस्थेच्या आरोग्य दूतांनी तात्काळ हाती खराटा घेऊन तो संपूर्ण कचरा उचलून साफसफाई करत गावात स्वच्छता केली. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.