
गुणरत्न सदावर्तेंनी घेतली ‘या’ 3 नेत्यांची नावे…
कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर 5 जुलैच्या मोर्चाच्या आयोजनाबाबत टीका केली होती. त्यानंतर आता सदावर्ते यांना धमक्या मिळत आहेत. तसेच सदावर्ते यांच्या निवासस्थानाबाहेर काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याचेही समोर आले आहे.
यावर बोलताना सदावर्ते यांनी माझी हत्या होऊ शकते असं विधान केलं आहे, तसेच हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या नेत्यांचीही नावे सांगितली आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत बोलताना म्हटले की, ‘माझी हत्या करण्यापर्यंत मला धमक्या मिळाल्या आहेत. माझ्या लेकराबाळांना अर्वाच्य शिवीगाळ करण्यात येत आहे. याबाबत सन्माननीय पोलीस महासंचालक ,पोलीस आयुक्त काळजी घेतील, दखल घेतील. परंतु मला हे सांगायचं आहे की जो गरजते हैं वो बरसते हैं ऐसा नहीं हैं. राज ठाकरे और उद्धव ठाकरे के विचार पाणी कम चाय है भाई, इनके पास कोई जनाधार नहीं है भाई ! ये तो साला गल्ली की राजनीति चलाने वाले चुट पुट लोग हैं .’
सदावर्ते यांनी पुढे बोलताना, राज ठाकरे यांना उत्तर द्यावा लागणार आहे, जिथे कुठे ते तांडव करणार आहेत. उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यावा लागणार आहे. ते विजयोत्सवाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची शैक्षणिक हत्या करणार. गरिबांची मुलं जे जिल्हा परिषदच्या शाळेत जातात, नगरपरिषदच्या किंवा आश्रम शाळेत जातात, त्या मुलांना 7 क्रेडिट मिळतील आणि इंग्रजी शाळेत जाणाऱ्या श्रीमंत मुलांना 12 क्रेडिट मिळतील. ही तफावत कोण भरून काढणार आहे ? असा सवाल उपस्थित केला आहे.
सदावर्ते पुढे बोलताना म्हणाले की, ‘नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची 3 भाषा शिकण्याचा निर्णय थांबण्याचा घाट जे उद्धव ठाकरे ने अगोदर मान्यता दिली परंतु आता ढोंग करत जोडीच्या राजकारणासाठी खर अर्थाने गरीब मुलांची वाट लागणार आहे. हे नुकसान कोण भरून काढणार आहे ? त्यामुळे मला म्हणायचं आहे की हे जे लोक आहेत ते नतद्रष्ट लोक आहेत. या लोकांमुळे मराठी शाळा बंद पडतील.’
माझी हत्या झाल्यास…
मला धमकी दिली जात आहे. हे लोक माझी व माझ्या कुटुंबाची हत्या करतील, कानाखाली मारतील. या त्यासाठी बक्षिसं ठेवलं आहे. यावर पोलिसांचा आयटी विभागने योग्य ती कारवाई करावी. माझी हत्या झाली तर राज ठाकरे आणि यांची पिलावळ ,उद्धव ठाकरे आणि वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे जबाबदार असतील असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.