
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना
(मंठा )
तालुक्यामध्ये इंग्रजी शाळा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत. तसेच आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत आहेत. परंतु इंग्रजी शाळेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कुठेही गुणवत्ताधारक शिक्षकांची नेमणूक केलेली दिसून येत नाही. काही शाळांमध्ये तर दहावी व बारावी पास मुला मुलींची भरती करण्यात आलेली आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत चाललेला आहे.
तसेच शाळेमधून दर्जाहीन बुक्स, नोटबुक, सॉक्स, बुट, यांची जास्त भावाने विक्री केली जात आहे. बुक्स निवडताना जे पब्लिकेशन सर्वात जास्त टक्केवारी देईल त्या बुकची निवड केली जात आहे. काही शाळनी तर हद्दच पार केली आहे. शाळांची मान्यता एका ठिकाणची आणि शाळा भरते दुसऱ्या ठिकाणी सरास शाळेतील मुलांना येण्या-जाण्याकरता वापरल्या जाणाऱ्या गाड्या विना परमिटच्या व त्यावर असणारे चालक विना परवानाधारक आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेचा विचार केला तर कुठल्याही सुविधा दिसून येत नाहीत.
हे सर्व पाहता असे दिसून येते की संबंधित विभागातील अधिकारी व इंग्रजी शाळा वाले विद्यार्थी व पालकांच्या आयुष्यातील स्वप्न धुळीस मिळवत आहेत. या सर्व गोष्टीकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे परंतु संबंधित विभाग दुर्लक्ष करून इंग्रजी शाळा वाल्यांशी हात मिळवणी करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्य व जीवितवासी खेळत आहे. अशा शाळावर त्वरित कारवाई करावी अशी तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.