
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अनेक विविध प्रकारच्या राजकीय घडामोडी होताना दिसून येत आहेत. नुकतेच विधान परिषदेवर घेतलेले आमदार अमित गोरखे यांना राज्य सरकारने विधान परिषदेचे तालीका सभापती म्हणून निवड करून महाराष्ट्रातील मातंग समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होतांना दिसत आहे. राज्यातील मातंग समाजाचे युवा नेतृत्व
म्हणून राज्य सरकारने आमदार अमित गोरखे यांना सभापती पदाची संधी देऊन एक युवा नेतृत्व उभ केल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात ऐकवयास मिळत आहे. आमदार अमित गोरखे यांना विधानपरिषदेवर
आमदार घेऊन त्यांना तालिका सभापती म्हणून त्यांची निवड केली हा मातंग समाजाचा अभिमान गौरव असून, आमदार व नवनिर्वाचित सभापती अमितजी गोरखे यांच्यावर महाराष्ट्रातील समाज
बांधवाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो आमदार अमित गोरखे यांच्यावर विश्वास दाखवले त्याबद्दल सुद्धा महाराष्ट्रातील मातंग समाज बांधवाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा आभार व्यक्त केले जात आहेत अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार स्वप्निल गव्हाणे यांनी व्यक्त केले.
अमित गोरखे हे नक्कीच समाजाच्या हितासाठी कार्य करुन समाजाला परिवर्तनाच्या दिशेने नेवून समाजाच्या अनेक मागण्यासाठी विधान परिषदेमध्ये आवाज उठवतील अशी अपेक्षा समाजाकडून होत असून भाजपाचे आमदार अमित गोरखे यांची सभापती पदी निवड ही ‘समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया माध्यमाशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार स्वप्निल गव्हाणे अबेसांगवीकर यांनी दिली