
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी दिघी पिंपरी चिंचवड -धनाजी साठे
दिघी:- दि. ३ जुलै २०२५ रोजी आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दिघी येथे, अवतरली बाल वारकऱ्यांची दिंडी पालखी सोहळा. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात दिघी येते सोहळा रंगला. विठ्ठल-रुखुमाई, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अशा अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षक ठरले. बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. आयोजित दिंडीमध्ये नर्सरी ते युकेजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. टाळ मृदुंग व विठू नामाची पालखीने मार्ग निनादला. दिंडीचे विशेष आकर्षण म्हणून आदर्श नगर दिघी गणेश मंदिर येथील महिला भजनी मंडळ यांनी भजन आणि भारुड सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाची यशस्वी कार्यवाही करण्यासाठी आदर्श स्कूल परिवारचे सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. दिंडी सोहळ्याचा समारोप सामुहिक प्रार्थना घेऊन करण्यात आला.यामध्ये सूत्रसंचालन श्रीमती पुनम जाधव मॅडम यांनी केले. श्रीमती तरन्नूम तांबोळी मॅडम यांनी आभार मानले. बाल वारकरी पायी दिंडीमध्ये पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.