
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथून कोमल संभाजी सात्रस ( वय ३२ ) ही महिला पती पत्नीच्या किरकोळ वादातून कुणालाही काही एक न सांगता निघून गेली आहे. पती संभाजी सात्रस यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ०२/०७/२०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पती संभाजी सात्रस व पत्नी कोमल सात्रस यांच्यात किरकोळ भांडणे झाल्याच्या कारणावरून कोमल सात्रस या रागाच्या भरात कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. सदर तक्रार सहा. फौजदार बनकर यांनी दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करत आहेत.