
एजबॅस्टनमध्ये सामना जिंकून देणारा भारताचा पहिला कोच; रवी शास्त्रीने शब्द घेतले मागे…
कोच गौतम गंभीरवर रवी शास्त्री यांचे वक्तव्य : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात सुरु असलेल्या मालिकेचा दुसरा सामना काल संपला. या सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाला त्याचबरोबर टीम इंडीयाचे कोच गौतम गंभीर याला मोठ्या प्रमाणात टीका सोशल मिडीयावर केली जात होती.
भारताच्या प्लेइंग 11 मध्ये टीम इंडीयाचा मुख्य गोलंदाज नाही त्यामुळे भारताचा संघ हा 20 विकेट्स घेण्यामध्ये अपयशी ठरेल असे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. क्रिकेट चाहत्यांनीच नाही तर अनेक क्रिकेट तज्ञांनी देखील यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
पहिल्या सामन्यात भारताच्या संघाचा पराभव झाल्यानंतर टीम इंडीयाने दुसऱ्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये अनेक बदल करण्यात आले होते. त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंग्लड दौऱ्यावर फक्त 3 सामने खेळणार आहे, असे बीसीसीआयने आधीच सांगितले होते. त्यामुळे आता तो पुढील सामन्यात खेळणार आहे हे भारताचा कर्णधार शुभमन गिल याने स्पष्ट केले आहे.
मालिकेचा दुसरा सामना सुरु होण्याआधी भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी सोशल स्काय क्रिकेटवर संवाद साधताना आणि त्याचे मत मांडताना अनेक प्रश्न उपस्थि केले होते. त्याचबरोबर भारताच्या प्लेइंग 11 वर बोट उचलले होते. स्काय क्रिकेटवर अविश्वास व्यक्त केला होता एवढेच नव्हे तर म्हटले होते की, ‘तुमच्याकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे आणि तुम्ही त्याला सात दिवसांच्या विश्रांतीनंतर बाहेर बसवता. हे विश्वास ठेवणे खूप कठीण आहे.’
भारताच्या संघाने सामना जिंकल्यानंतर भारताचे मुख्य कोच गौतम गंभीर यांच्या चेहऱ्यावर हसु पाहायला मिळाले. यावेळी भारताचे माजी कोच रवी शास्त्री हे काॅमेंट्री बाॅक्समध्ये होते. यावेळी ते म्हणाले की असे हास्य वारंवार पाहण्याची गरज नाही, पण तो त्याचे सर्वस्व पात्र आहे. मालिका जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही लगेचच परतता तेव्हा प्रशिक्षकासाठी यापेक्षा चांगली भावना दुसरी कोणतीही असू शकत नाही.’ असे त्यांनी सांगितले.
भारताच्या संघामध्ये झालेल्या बदलांबद्दल सांगायचे झाले तर जसप्रीत बुमराहच्या जागेवर या सामन्यात आकाशदीपला संघामध्ये स्थान मिळाले होते. त्याचबरोबर इंग्लड दौऱ्यावर भारतीय संघामध्ये पदापर्ण करणारा साई सुदर्शन याला बाहेर केले होते. त्याच्या जागेवर वाॅशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली होती. शार्दुल ठाकुर याला संघामधुन बाहेर केले आणि त्याच्या जागेवर नितिश कुमार रेड्डी याला संघामध्ये स्थान मिळाले होते पण तो विशेष कामगिरी करु शकला नाही.