
हिंदूत्व, मराठी, गिरणी कामगार म्हणत उद्धव ठाकरेंना घेरलं…
विजयी मेळाव्यात एकत्र आलेल्या राज-उद्धव ठाकरेंच्या पक्षात पुन्हा एकी दिसून आली. आज (बुधवार) मुंबईसह महाराष्ट्रातील गिरणी कामगार संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले आहे.
या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेने पाठींबा दिला आहे. स्वतः उद्धव ठाकरे गिरीणी कामारांच्या प्रश्नासाठी होणाऱ्या सभेत मार्गदर्शन देखील केले. या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे देखील उपस्थित आहेत.
ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये पुन्हा ऐकी दिसून येत असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केला आहे. ‘उद्धव ठाकरेंची सत्ता गेली आणि त्यांना हिंदूत्व, मराठी माणूस, कोकणची जनता व गिरणी कामगार यांचे प्रश्न दिसू लागले.’, असे राणे म्हणाले आहेत
सत्ता असताना कुठेही कोकणाला न्याय नाही, गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत. मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहिले नाही. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे हा.’, असा प्रहार देखील राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
उद्धव ठाकरेंमध्ये धमक नाही
नारायण राणे यांनी विजयी मेळाव्याच्या आधी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही, असे राणे म्हणाले होते.
ठाकरेंचे मराठी प्रेम बेगडी
नारायण राणे यांनी याआधी देखील उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांचे मराठी प्रेम बेगडी आहे. राजकीय व स्वार्थापोटी आहे. मराठीच्या नावावर केवळ आपले कल्याण करून घेतले.मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय ?महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८ टक्केपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण ? असा सवाल देखील केला होता.