दैनिक चालु वार्ता म्हसळा-(रायगड )प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – कोकणचे भाग्य विधाते,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष,खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्हसळा तालुका जिजामाता शिक्षण संस्था वरवठणे आगरवाडा शाळेत वृक्ष लागवड,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून शाळा संचालक मंडळ व मान्यवरांनीअभिष्टचिंतन केले.यावेळी खासदार सुनिल तटकरे यांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली संस्थापक अध्यक्ष माजी सभापती महादेवराव पाटील,संचालक मंडळाचे सदस्य समाजसेवक लक्ष्मण कांबळे,जेष्ठ नेते,माजी सरपंच रियाजभाई फकीह,माजी नगराध्यक्ष,शिव,संचालक दिलीप कांबळे,संचालक सचिव अशोक काते,जयसिंग बेटकरसर,शिक्षकवृंद अंगद कांबळे ,दिपक म्हात्रे,म्हस्के सर,लिपिक अंकुश गाणेकर,कर्मचारी लक्ष्मण गाणेकर आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.
