
■ दैनिक चालु वार्ता रत्नागिरी प्रतिनीधी-समिर शिरवडकर
राजापूर:- ( जैतापूर) :-
“आम्ही गेली ५० वर्ष राज्यभर कॅरम स्पर्धांमध्ये सहभागी होतो, पण जैतापूरच्या या मंडळासारखं नियोजन आणि आत्मीयता कुठेही पाहायला मिळाली नाही. जनरेटरवरसुद्धा स्पर्धा घ्यावी लागली तरी मंडळाने हार मानली नाही, हे आयोजन एकमेवाद्वितीय आहे.” अशा शब्दांत रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर यांनी जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
मंडळाच्या वतीने व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित “आमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत सन्मान चषक” कॅरम स्पर्धेचा भव्य शुभारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशपाकशेठ हाजु यांच्या हस्ते करण्यात आला.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस व वारकरी संप्रदाय अध्यक्ष रविंद्र नागरेकर, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, खजिनदार नितीन लिमये, सेक्रेटरी मिलिंद साप्ते, राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर, सहपंच सागर कुलकर्णी, सदस्य विवेक देसाई, यांच्यासह राजापूर ते मंडणगड पर्यंतचे नामवंत कॅरमपटू उपस्थित होते.
या प्रसंगी दोन वेळा कॅरम विश्व उपविजेता, आरसिएफ कप विजेता व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू रियाज अकबर अली, राज्यविजेता अभिषेक चव्हाण, आणि अनुभवी खेळाडू राहुल भस्मे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या उद्घाटन प्रसंगी जैतापूर सरपंच राजप्रसाद राऊत, मनोज आडविरकर, राजाराम पारकर, भाई कणेरी, बंड्या चव्हाण, नवनाथ शेलार, सिद्धी शिरसेकर, जानवी गावकर, राजेंद्रप्रसाद राऊत, समीर शिरवडकर, राजन कोंडेकर, वैभव कुवेसकर, सरफराज काझी, प्रसाद पंगेरकर, विजय कुनकवळेकर, विलास अवसरे, सत्यवान आडिवरेकर, रमेश राणे, शशांक शिरवडकर, सुनिल जाधव, जितेंद्र गावकर, समीर पावसकर, नासिर काझी आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.
स्पर्धेसाठी जलाल काझी यांनी मोफत हॉल उपलब्ध करून दिला. तर जैतापूरचा राजा मंडळाचे कार्यकर्ते व राजा भक्त यांनी उत्कृष्ट नियोजन, वेळेचं काटेकोर पालन आणि खेळाडूंना योग्य सुविधा देत एक आदर्श उपक्रम राबवत आहेत
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर ,श्रीकृष्ण राऊत,राकेश दांडेकर, प्रसाद मांजरेकर ,स्वप्निल सोगम, संदीप चव्हाण,महेश नारकर,मनिष करगुटकर, दिग्विजय पेडणेकर,देवेश खानविलकर,एकनाथ पाटील, आणि निलेश पालकर मेहनत घेत आहेत. जैतापूर चा राजा मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅरमविश्वात राज्यात आपला वेगळा ठसा उमटवेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.