
दैनिक चालु वार्ता म्हसळा -( रायगड )प्र. अंगद कांबळे
म्हसळा-सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण दैदिप्यमान काम करत असलेले रायगडचे खासदार सुनिल तटकरे, राज्याच्या महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार युवा नेते अनिकेत तटकरे यांच्या पुढाकाराने श्रीवर्धन मतदार संघात दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे,शहरातील मुलांना ज्या पद्धतीने सुविधा मिळतात तशाच सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून गोरगरीब कष्टकरी वर्गातील मुल उच्चशिक्षित व्हावीत या स्तुत्य हेतुने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मार्फत म्हसळा तालुक्यात सर्व शाळा महाविद्यालयात शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येते.या मध्ये प्रामुख्याने करिअर मार्गदर्शन,संगणक,विज्ञान साहित्य,क्रीडा साहित्य,सायकल आणि वह्या वाटप करण्यात येत असल्याचे म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी मौजे जिजामाता शिक्षण संस्था वरवठणे आगरवाडा शाळेत वह्या वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सांगीतले.तालुक्याचा सर्वांगीण विकास काम करण्यात साहेब,ताई आणि भाई यांचा हातखंडा आहे ते कोणाला शक्य होणार नसल्याचे मत संचालक दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले.म्हसळा तालुक्यातील पंचायत समितीच्या चार गणांतील राजीप प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेतील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला.वह्या वाटप कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती शाळा संस्थापक अध्यक्ष महादेव पाटील,संचालक माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,माजी सरपंच रियाजभाई फकीह,गणअध्यक्ष सतीश शिगवण,उपाध्यक्ष प्रकाश गाणेकर,माजी सरपंच भिकू पाटील,युवा संघटक किरण पालांडे, अशोक अधिकारी,मुख्याध्यापक संदीप कांबळेकर आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.या स्तुत्य उपक्रमाचे संस्था अध्यक्ष महादेव पाटील, शाळा विध्यार्थी आणि शिक्षक वर्गाने खासदार,आमदार आणि मंत्री महोदयांना धन्यवाद दिले.