
मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा !
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहे.
त्यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. ऐन गणपतीच्या कालावधीत मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडक देणार आहेत. कोणीही आडवे आले तरी, आम्ही २९ ऑगस्टला मुंबईला जाणारच असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.