
पुणे: पुण्याची जीवन वाहिनी असणाऱ्या पीएमपीएमएलचे वाहक श्री प्रशांत शंकर भोसले यांना या वर्षीचा आदर्श कामगार म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड च्या कात्रज आगारात प्रशांत भोसले हे वाहक पदावर कार्यरत आहेत.कोविडमध्ये अनेकांचे प्राण वाचवण्याची महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली होती.वाहक म्हणून कर्तव्यावर असताना अनेक वेळा प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू त्यांनी सदर प्रवाशांसी संपर्क साधून त्यांना प्रामाणिकपणे परत केल्या आहेत.प्रवासा दरम्यान प्रवाशांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांना वेळोवेळी मदत करणारे व प्रवाशांसी सौजन्याने वागणारे प्रशांत भोसले यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले आहे.कोविडमधील उल्लेखनीय कामगिरी बद्दल २०२२चा वर्ल्ड पार्लमेंट अंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
त्याच बरोबर डॉ.ए पी जे अब्दुल कलाम युवा प्रेरणा पुरस्कारनेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.नुकतेच त्यांना महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलकडून समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.प्रशांत भोसले यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असताना लेखन कला ही जपली आहे.स्टोरी मिरर प्रस्तुत सांज तरंग या नाविन्यपूर्ण काव्यसंग्रहासाठी सहलेखक म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे.सांज तरंग हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.स्त्री जीवनावर आधारित कथा संग्रह लवकरच प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे.
प्रशांत भोसले यांनी आजपर्यंत अनेक नाटकांमधून वेगवेगळ्या छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत.त्यांची सोन्याची चाळ ही मराठी वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे.कंडक्टरचा जीवन पट उलघडणाऱ्या सार या मराठी शॉर्ट फिल्म मध्ये ही त्यांनी भूमिका बजावली आहे.
त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची दखल घेऊन ए डी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना या वर्षीचा आदर्श कामगार म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.त्यामुळे त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यासाठी कात्रज आगाराचे आगार प्रमुख श्री गाजरे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक २३ऑगस्ट रोजी सांगली येथे संपन्न होणार आहे.