
धक्कादायक माहिती पुढे; अमेरिकी लष्कराचे…
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचे कारण रशिया असल्याचे म्हटले. रशियाकडून भारत हा तेल खरेदी करत असल्याने आपण टॅरिफ लावत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
डोनाल्ड ट्रम्प यांची मागील काही दिवसांपासून पाकिस्तानसोबतची जवळीकता वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे ट्रम्प कुटुंबियांचा पाकिस्तानमध्ये असलेला व्यापार. रिपोर्टनुसार, ट्रम्प कुटुंबाची पाकिस्तानमध्ये तेल आणि रिअल इस्टेट गुंतवणूक आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानला झुकते माफ देतात.
हेच नाही तर पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरानंतर अमेरिकेकडून मोठी मदत ही पाकिस्तानला पुरवण्यात आली. त्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचे खासगी संबंध पाकिस्तानसोबत आहेत. ट्रम्प कुटुंबिय पाकिस्तानातून मोठा पैसा कमावतात. खाजगी व्यावसायिक हित संबंधांसाठी डोनाल्ड ट्रम्प हे भारताला टार्गेट करत असल्याचा दावा काहींनी केलाय. हे धोरण भारतासाठी एक मोठा धोरणात्मक धोका असल्याचे मत तज्ञांचे आहे. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने पाकिस्तानला साथ देताना दिसत आहेत.
यासोबतच भारत आणि पाकिस्तान युद्धाबाबतही ते धक्कादायक विधाने करताना दिसत आहेत. पाकिस्तानने मोठा डाव हा भारताच्या विरोधात टाकला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. काही नियम बाजूला सारून त्यांनी ही गुंतवणूक करायला लावली. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचा पुळका उठला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांचे फक्त तेल आणि रिअल इस्टेट याच क्षेत्रात गुंतवणूक नाही तर इतरही काही क्षेत्रात असल्याचा दावा केला जातोय. मिलियनमध्ये ट्रम्प कुटुंबियांनी अमेरिकेत गुंतवणूक केलीये.
हा मोठा धोका पुढील काही वर्ष भारताला असणार आहे. भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावला आहे. मात्र, पाकिस्तानवर अजिबात नाही, उलट पाकिस्तानला अमेरिका मदत करताना दिसत आहेत. पाकिस्तानात आलेल्या पुरानंतर थेट अमेरिकन हवाई दलाचे मोठे C-17 ग्लोबमास्टर III हे विमान पहाटे पाकिस्तानातील नूर खान एअरबेसवर पोहोचले. मोठी मदत अमेरिकेतून पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आली. त्यामागे हे सर्व समिकरणे आहेत.