इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
*इगतपुरी* :- ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळ,इगतपुरी शाखेच्या वतीने आज दिनांक ०१/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता सेवानिवृत्त कामगारांच्या समस्या बाबत एन.आर.एम.यु.ऑफीस इगतपुरी शाखेच्या कार्यालयात मिटिंग आयोजित केली होती.मिटिंगला सुरवात करण्या अगोदर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांच्या प्रतिमेस काॅ.व्हि.आनंदन महामंत्री मुख्यालय,काॅ.जे.एन पाटील अध्यक्ष मुंबई मंडळ यांचेहस्ते पुष्पहार घालुन सभेची सुरवात करण्यात आली सभेस कमीत – कमी शंभर दिडशे सेवानिवृत्त कामगार (महिला व पुरुष) उपस्थित होते. काॅ.व्हि.आनंदन महामंत्री मुख्यालय मार्गदर्शन करताना आठवे पे कमीशन साठी कामगारांना सरकार विरोधी लढा करवया लागेल अशी सुचना व्यक्त केली. काॅ.जे.एन.पाटील अध्यक्ष मुंबई मंडळ यांनी उपस्थित समुदायास योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. प्रत्येक सेवानिवृत्त कामगार हा फेडरेशनचा सभासद झाला पाहीजे, सभासद वार्षिक वर्गणी तिनशे रुपये कायम स्वरुपी वर्गणी तिन हजार रूपए असणार अशी माहिती दिली. काॅ.नारायण सोनावने उपाध्यक्ष मुंबई मंडळ, काॅ.वसंत कासार ऑर्गनाइजेन सेक्रेटरी मुंबई मंडळ, काॅ.आनंदा भालेराव सचिव मुंबई मंडळ, काॅ.राजु जगताप अध्यक्ष कर्जत नेरळ शाखा,काॅ.अनंत लगड सचिव वाशिंद शाखा,काॅ.अहमद खान सचिव इगतपुरी शाखा सर्व मान्यवरांनी उपस्थित समुदायास योग्य प्रकारे मार्गदर्शन केले.मेळाव्यास काॅ.दिलीप शिंदे आर्गनाइज सेक्रेटरी कसारा शाखा, काॅ.नंदु बोंडवे अध्यक्ष वाशिंद शाखा,काॅ.अशोक महाजन खजीनदार वासिंद शाखा उपस्थित होते. काॅ.मधुकर कडु अध्यक्ष इगतपुरी शाखा ह्यानी सर्व मान्यवरांचे आभार मानुन मिटिंग समाप्त केली.
काॅ.वेणु पी नायर महामंत्री जी को लाल सलाम, एन.आर.एम.यु जिंदाबाद, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद, कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही अश्या घोषणा देत जयजयकार केला.


