दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-तालुक्यातील गोलेगाव येथे असलेल्या समाज कल्याण विभाग अंतर्गत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द शासकीय निवासी मुलांची शाळा गोलेगाव या शाळेने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये शाळेने घवघवतीत यश संपादन केले आहे . या शाळेने १००% निकाल लावून तालुक्यात वर्चस्व गाजवले आहे . सुरवाती पासूनच १००% निकाल देणारी समाज कल्याण ची तालुक्यातील प्रथम शाळा दिसून येत आहे.प्रथम क्रमांक लगाडे प्रतीक ८८% , द्वितीय खंडागळे रोहन ८६.६०% , तृतीय क्रमांक कांबळे विशाल ८५ % मिसाळ प्रेम ८६% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत . यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक ए. एस. शितोळे यांनी पुष्पहार व पेढे भरवून अभिनंदन केले आहे .
आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शाळेला पत्र पाठवून यशस्वी विद्यार्थी ,मुख्याध्यापक , शिक्षक व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे .यावेळी मुख्याध्यापक ए. एस. शितोळे , शिक्षक पी. बी.शिंदे , एस .आर. सानप , बी. के.पाटील , एस. नाईकवाडी सह कर्मचारी उपस्थित होते .
