दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – अखंड हरीनाम सप्ताह पांगरी येथे पहिल्या दिवसाची किर्तनसेवा रामायणाचार्य श्री ह भ प राजन महाराज काशीद यांची संपन्न झाली . यावेळी गायनसाथ कैलास महाराज पौळ , सोपान महाराज पौळ , राम महाराज जगताप , बाळासाहेब महाराज कुलकर्णी , तर मृदंगसाथ बालाजी जामगे , वेदांत लोखंडे सह परीसरातील गुणीजन भजनी मंडळी श्रोते मंडळी उपस्थित होते.
मानवी जीवन जगत असताना मनुष्याने संताची संगत करावी त्यामुळे मानवी जीवन यशस्वी होते संताचे नामस्मरण केल्याने पुण्य मिळते आयुष्यात अतिलोभ न करता चित्त एकाग्र व भक्तीमध्ये विलीन व्हावे , समाधान हि अंतःकरणाची संपत्ती आहे.
मानवी जीवन जगत असताना आपली वणी हि गोड मधुर मवाळ रसाळ असावी आयुष्यात कोणी होणाचे नाही मनुष्य हा जन्मता एकटाच आला व जाताना ही एकटाच जाणार असल्याचे त्यांनी मार्मिक उदाहरण मुलगा , मुलगी यांच्या कवितेच्या उदाहरणातुन दिले.
भारत हा कृषिप्रधान देश आहे पण याच देशात शेतकऱ्यांची कशी दुर्दशा होत चालली आहे त्याचे पण उदाहरण कवितेच्या माध्यमातून दिले जिवनात जगत असताना भक्तीच्या मार्गाने जात तर जिवनात नक्कीच प्रगती होईल व सफलता मिळेल असे प्रतिपादन किर्तसेवेतुन रामयणाचार्य राजन महाराज काशीद यांनी यावेळी श्रोत्यांना केले.
