दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -आत्माराम जाधव
रिसोड : पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या रिसोड तालुका उपाध्यक्ष पदी पत्रकार वसंत खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाशिम येथे नुकत्याच पार पडलेल्या संघटनेच्या स्नेहमिलन सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी खडसे यांना पुष्पगुच्छ देवून त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.
पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांना वाचा फोडणारी व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्रासह, विविध राज्यात कार्यरत असलेली अग्रणी संघटना आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनात संघटनेची संपूर्ण देशात घोडदौड सुरू असून, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करणारी म्हणून, अल्पावधीतच नावारूपास आलेली व्हॉईस ऑफ मीडिया ही महाराष्ट्रातील अग्रगण्य संघटना आहे. पत्रकारितेतील उज्वल कारकीर्द व तगडा अनुभव पाहून वसंत खडसे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. या प्रसंगी संघटनेच्या कार्यालयीन सचिव दिव्या भोसले पाटील, साप्ताहिक विंगचे अध्यक्ष विनोद बोरे, दिव्या देशमुख, जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, उपाध्यक्ष आकाश शिंदे, आर्जुन पाटील खरात, तालुकाध्यक्ष विनोद बोडखे, तालुक्यातील जेष्ठ पत्रकार उध्वराव जटाळे आदींची उपस्थिती होती.
कोरोना महामारीत अनेक पत्रकारांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याच्या संवेदशीलतेतून व्हॉईस ऑफ मीडियाचा जन्म झाला असून, भविष्यात अशी बिकट परिस्थिती उद्धभवू नये म्हणून संघटनेचे कार्य सुरू आहे. पत्रकारांचा विमा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, कुटुंबातील आजारी व्यक्तीची काळजी एवढेच नव्हे, तर पत्रकारीतेचे शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिष्यवृत्तीची सोय करून देणारी व्हॉईस ऑफ मीडिया ही देशातील अग्रगण्य संघटना असून , आशा संघटनेत मला काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो. संघटनेने टाकलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू असे मत पत्रकार वसंत खडसे यांनी व्यक्त केले आहे.
