दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:प्रभू श्रीराम नवमी व हिंदू एकता दिवसा निमित्त दि.९ एप्रिल रोजी बिलोली शहरात हिंदू महागर्जना रॕली व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जनावरांच्या आठवडी बाजारात पार पडणाऱ्या या धर्मसभेला हैद्राबादचे आमदार राजासिंग हे संबोधीत करणार असल्यामुळे राजासिंह यांच्या सभेसाठी शहरासह तालुक्यातील समस्त हिंदू समाजाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात सभेचे बँनर लावुन सभेचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.
या धर्मसभेसाठी स्वामी प्रणवनंदजी महाराज हरिद्वार इंदौर,खासदार प्रताप पाटील चिखलीकर,जिल्हा मंत्री शशिकांत पाटील,आ.राम पाटील रातोळीकर,आ.तुषार राठोड,आ.राजेश पवार,माजी आ.सुभाष साबणे,श्रावण पा.भिलवंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे.बजरंग दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या धर्मसभा व महागर्जना रॕलीसाठी बजरंग दलासह हिंदू बांधव जय्यत तयारी करत आहेत. हैद्राबादचे आमदार टि.राजासिंह येणार असल्याने बिलोली शहरासह तालुक्यातील गावागावात बजरंग दल व हिंदू समाज बांधवांच्या वतीने मोठ्या प्रमाणात बँनर व पोस्टर लावून जनजागृती करण्यात आहे.
दि.९ एप्रिल रोजी दुपारी बिलोली येथील कुंडलवाडी मार्गावर असलेल्या बागेतील हनुमान मंदीर ते जनावरांच्या आठवडी बाजार मैदानापर्यंत हिंदू महागर्जना रॕली काढण्यात येणार आहे. तर सायंकाळी जनावरांच्या आठवडी बाजार मैदानावर हैद्राबादचे आमदार टि.राजासिंग हे धर्मसभेला संबोधीत करणार आहेत. बिलोली येथे होत असलेल्या या धर्मसभा व हिंदू गर्जना रॕलीस हजारो हिंदू समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे बजरंग दलाचे सतीश गौड मोतीवार व गजानन पांचाळ यांनी सांगितले आहे.
