दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडरची भाववाढ आणि शेतमालाचे घसरलेले भाव यामुळे अगोदरच त्रस्त झालेल्या जनतेवर आता टोल कंपन्यांनी १८ ते ३२ टक्के टोल टॅक्स वाढवून ‘टोल’धाड टाकली आहे.
गेल्या वर्षभरात डिझेल, पेट्रोलच्या दरात प्रचंड वाढ झाली असल्यामुळे दुचाकी, चारचाकी व मोठे
वाहनधारक हैराण झाले आहेत. गेल्या दोन वर्षाच्याकाळात गॅस कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक गॅससिलेंडरच्या दरात प्रचंड वाढ केल्यामुळे गृहिणींचे बजेटबिघडले असून विवाह, सण उत्सवासारखे समारंभकरणे आता महाग झाले आहे. एकीकडे गॅस, पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त झालेली असतानादुसरीकडे शेतमाल घरात येण्याच्या ऐन मोक्याच्या वेळीसोयाबीन, तूरडाळ, कापूस आयातीच्या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे बाजारात मोठ्या प्रमाणातशेतमालाचे भाव घसरले आहेत. यामुळे सामान्यजनतेपासून सर्व शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. अशाअत्यंत बिकट परिस्थितीतच १ एप्रिलपासून राज्यातीलसर्व टोलनाका चालविणाऱ्या कंपन्यांनी टोल टॅक्स मध्ये किमान १८ ते ३२ टक्के एवढी जबर वाढ केली आहे.टोल कंपन्यांनी केलेली ही टोल टॅक्स मधील वाढम्हणजे एक प्रकारे जनतेवर लादलेली ही ‘टोल’धाडआहे. राज्यातील विविध मार्गावर प्रवासी वाहतूक,मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टोलटॅक्समध्ये जबरवाढ करण्यात आली आहे. देगलूर- नांदेड मार्गावर वन्नाळी आणि कृष्णर येथे कल्याण कंपनीचे टोल नाके आहेत. देगलूरहून नांदेडला जाणाऱ्या १५ पेक्षा अधिक क्षमतेचा प्रवासी वाहन परवाना असलेल्या वाहनांना वन्नाळी येथे पूर्वी ८५ रुपये टोल टॅक्स द्यावा लागत असे. १ एप्रिल पासून या वाहनाला ११० रुपये टोल टॅक्स द्यावा लागत आहे. याच वाहनाला पुढे गेल्यानंतर कृष्णुर येथे १७५ रुपये टोल टॅक्सद्यावा लागत असे आता त्यात वाढ करून २३० रुपये एवढा करण्यातआला आहे. त्यामुळे या मार्गावर जवळपास ३१ ते ३२ टक्के टोल टॅक्स वाढ झाली आहे. एकीकडे टोल कंपन्या टोल टॅक्स वाढवीत आहेत तर दुसरीकडे ज्या रस्त्यासाठी टोल घेत आहेत त्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे त्यांचे अजिबात लक्ष नसते. देगलूर- नरसी या मार्गावर खानापूर फाटा ते केरुर पर्यंत रस्ता उंच खोल झाल्यामुळे जहाजात बसल्याचा प्रवाशांना अनुभव येत आहे. रस्ता तयार करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्ट्या भरण्याची गरज असते. या रस्त्यावर बहुतांश ठिकाणी साईड पट्ट्या भरल्या नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्याची गरज असताना कोणीही जबाबदार अधिकारी जाब विचारत नसल्यामुळे टोल कंपन्यांनी वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष केले आहे. एकदरीत टोल कंपन्यांनी केलेल्या टोलटॅक्स वाढीमुळे येत्या कांही दिवसात महागाईत वाढ झालेली दिसून येणार आहे.
