दैनिक चालु वार्ता न्युज नेटवर्क-जिवन जाधव /लातुर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आयत्या वेळी अर्थीक भक्कम असलेला आयात उमेदवार लादु नये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची अपेक्षा
संबंध राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्या साठी आरक्षण सोडत झाली आहे. आता फक्त अवघे काही तास उमेदवारी दाखल करण्यासाठी उरलेले आहेत . तरी आणखीन कोणत्याच पक्षाचा उमेदवार निश्चित झाले नसुन .औसा पंचायत समिती सभापती पद हे पुरूषाला आरक्षीत असल्याने निवडणुकी मध्ये मोठी चुरस होण्याची शकता वर्तवली जात असुन . अनेक बडे दिग्गज कार्यकर्ते निवडणुक आखाड्यात
आपल भवितव्य आजमावण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. परंतु सर्वांचेच लक्ष आपापल्या नेत्याकडे लागलेचे दिसून येत आहे. ग्रामिण भागातील स्थनिक कार्यकत्यांना सतत एकच प्रश्न भेडसावत असल्याचे बोलले जात आहे. ते म्हणजे निष्ठावंत कार्यकत्यांना न्याय मिळेल की पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा अशा उमेदवारांना उमेदवारी मिळेल. तसेच मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्ते सोडून आयत्या वेळी अर्थीक बाजु भक्कम असलेला आयात उमेदवार देऊन लादुन निष्ठावंत कार्यकत्यांवर अन्याय केला जाईल की काय अशी भीती स्थानिक निष्ठावंत कार्यकत्यांमधुन व्यक्त होत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने तालुक्यातील सर्वच गटा मध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे. सर्वच राजकीय पक्ष ताकदीने निवडणूक लढविणार आहेत. आपल्या मर्जीतला उमेदवार असायला पाहिजे, यासाठी खासदार, आमदार सह लोकनेते यांची आपल्या निकटवर्तीयासाठी आग्रही असल्याच ही पहायला मीळत आहेत , सर्वच पक्षाचे कार्यकर्ता असो की पक्षाचा निष्ठावंत कार्यकत्यांना पक्षश्रेष्ठींनी तिकीट देऊन न्याय द्यावा, अशी निष्ठावंत कार्यकत्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्यातरी सर्वच पक्षांमधील कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ईच्छाशक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपापली उमेदवारीसाठी ताकद दाखवत आहेत . मतदारसंघाशी नाळ नसलेला व मतदारांची ओळख नसलेला व गटाशी ठावठिकाणा माहिती नसलेला कार्यकताहीं मी उमेदवार महणून मिरवत आहे. खासदार, आमदारांच्या मर्जीतले कार्यकर्ते आनोळखी मतदार संघ मागणी करुन आपल नशिब आजमावण्यासाठी आग्रही आहेत. त्यातच अनेक कंञाटदार पैशाच्च्या जोरावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चर्चा होत आहे.व अशे अनेक गुत्तेदार आपली गुत्तेदारी चालावी आसाठी उमेदवारी मीळावी मनुन वशिलेबाजी चालत असल्याचही दीसत आहे ,तरी सर्वसामान्य कार्यकत्यांनी आजवर घरची भाजी भाकरी खाउन आपापल्या पक्ष्यांचे झेंडे घेऊन,माईकवर भाषणे करने व आपल्या नेत्यांच कौतुक करत पक्ष आणि साहेबांचा जय जयकार करायचा आणि पक्षाच्या आदेशानुसार सतरंज्या उचलायचा, यासाठीच व एवढेच महत्व कार्यकर्त्याला राहिले का..? असा प्रश्नही सर्वच राजकीय पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.नेत्यांच्या घरी कार्यकत्यांची गर्दी तिकीटासाठी दिसून येत आहे. निष्ठावंत की आयात उमेदवारांना उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे तरी औसा तालुक्यामध्ये तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना (उ.बा. ठा.) सह राष्ट्रवादी .महाराष्ट्र नवनिर्मान सेना सह वंचितची लढत होईल, अशी चर्चा केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साहेबांच्या मर्जीतल्या लोकांना संधी मिळेल की रात्रंदिवस घरची भाकर भाजी खाऊन पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या सामान्य निष्ठावंत कार्यकत्याला संधी मिळेल, अशी सर्वत्र कार्यकर्त्यामध्ये चर्चा रंगली आहे. जर पैसे वाला आयात उमेदवार कुटल्या गटात लादला गेला तर निष्टावंत कार्यकर्ते बंडखोरी करण्याची भीती सर्वच पक्षांना आवाहन असणार आहे , तरी ग्रामिन भागात सर्व पक्षीय नेत्यांनी आपापल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दयावी अशी मागणी जोर धरत असुन अनेक गटात व पंचायत समिती गणात जर आयात उमेदवार दीला गेला तर त्या आयात उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार असल्याने पक्षाने निष्ठावंताला न्याय दयावा व जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणुकीत स्थानीक उमेदवारांना प्राधान्य दयावे
