ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
डायघर (मुंब्रा)-दिनांक २९/०१/२०२६ रोजी दुपारी १५:०० वाजेच्या सुमारास रिगल हॉटेलच्या बाजुस, शिळफाटा ता. जि. ठाणे येथे इसम नामे सैफअलि खान याने तक्रारदार महमंद फैसल मतीउल्लाह शेख यास चारचाकी व्हगॅनोर कार क्रमांक MH 02 GH 9367 ही डिपॉझीटची रक्कम घेवून व प्रतिदिन भाडे ठरवून चालविणे करीता दिलेली होती. सदरचे वाहन तक्रारदार याने परत दिले होते परंतु आरोपी डिपॉझीटची रक्कम परत देत नव्हता यावरून त्याच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने सैफअलि खान याने डिपॉझीटची रक्कम तक्रारदार यास परत देण्याकरीता बोलाविले असता सदर रक्कम स्विकारणे करीता तक्रारदार महमंद फैसल मतीउल्लाह शेख व त्याचे मित्र अबुतालीब, सचिन व अमन शेख यांच्यासह सदर ठिकाणी आले असता सैफअलि खान हा शोएब खान व आरिफ खान याचे सोबत चारचाकी कार क्रमांक MH 02 GH 9367 हिने सदर ठिकाणी आलात्यावेळी त्याच्यात वाद होवून शिवीगाळ व हाताने धक्काबुक्की झाली तेव्हा आरिफ खान याने अमन शेख याचे दोन्ही हात पाठीमागुन पकडले त्यावेळी सैफअली खान व शोएब खान याने त्याच्या जवळील धारदार चाकुने त्याच्या छातीवर जोराने वार करून त्याचा खुन केला आहे. तसेच अबुतालीब हा त्यास वाचवण्याकरीता गेला असता त्यांच्या डाव्या हातावर कोपराखाली चाकुने दुखापत केली त्या तिघांनी तक्रारदार यांचे जबरदस्तीने अपहरण करून ‘अभि इसका भी काम कर डालते है’ असे धमकावुन त्यांनी मारहाण केली व तक्रारदार योच खिश्यातील ५०००/-रूपये रोख असे जबरदस्ती काढुन घेतले म्हणून इसम नामे १) सैफअली निजामउद्दीन खान वय २९ वर्षे, २) शोएब निजामउद्दीन खान वय २० वर्षे, ३) आरिफ आताउल खान वय २८ वर्षे, सर्व राहणार सध्या डोबिंवली, मानपाडा (पूर्व) यांच्या विरोधात तक्रारदार महमंद फैसल मतीउल्लाह शेख याचे तक्रारी वरून शिळ डायघर पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. ६६/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), १४०(१), ११५(२), ११८ (१), ३०९ (६), ३५१(३), ३ (५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे नमूद आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा. वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वपोनि/श्री. श्रीराम पौळ यांनी आरोपीचा शोध तपासकामी अधिनस्त अधिकारी / अंमलदार यांचे दोन तपास पथके तयार केली. गुन्हयाचा तपास चालू असताना गुप्त बातमीदार व तांत्रीक तपासाच्या आधारे आरोपीचा कसोशीने शोध घेवुन सदर गुन्हयात आरोपी नामे १) सैफअली निजामउद्दीन खान वय २९ वर्षे, २) शोएब निजामउद्दीन खान वय २० वर्षे ३) आरिफ आताउल खान वय २८ वर्षे, सर्व राहणार सध्या डोबिंवली, मानपाडा (पूर्व) यांना देसाई गांव येथून ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातील जिवेठार मारण्याच्या उददेशाने अपहरण केलेला तक्रारदार महमंद फैसल मतीउल्लाह शेख याची सुटका करून त्याचा जिव वाचविला शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करुन सदर गुन्हयातील आरोपीतांना सदर गुन्हयात २ तासात आरोपीनी गुन्हयात वापरलेली मोटार कार व हत्यारांसह अटक करुन खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून स्तुत्य अशी कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगिरी श्री. सुभाष बुरसे, पोलीस उप आयुक्त परि. १, ठाणे, श्रीमती प्रिया डमाळे, सहा. पोलीस आयुक्त, कळवा विभाग, वपोनि/श्री. श्रीराम पौळ, शिळ-डायघर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि (गुन्हे/श्री. गजेंद्र राऊत, सपोनि/प्रशांत खरात, सपोनि/अनिल राजपुत, सपोनि दत्ताजीराव पवार, सपोनि/अमोल पोवार, पोउपनिरी/नितीन बेळगे, पोउपनिरी/अजय तिडके, पोहवा / मोरे, पोहवा / भरत जाधव, पोहवा/कांबळे, पोहवा/मोटे, पोहवा/लिंगाळे, पोहवा/पाटील, पोहवा/जुवाटकर, पोना/यादव, पोना/पाटील, पोना/जाधव, पोशि/फुकळे, पोशि/खाडे, पोशि/बोरकर, पोशि/सोनवलकर, पोशि/तडवी, पोना/माळी (तांत्रिक मदत) यांनी केलेली असून प्रस्तुत गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) / श्री. गजेंद्र राऊत हे करीत आहेत.
