दैनिक चालु वार्ता म्हसळा -( रायगड)प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुक्यात झंझावाती दौरा करत विविध गावांना भेटी दिल्या.प्रचार दौऱ्यात ग्रामस्थांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून विकासाची लढाई असल्याचे प्रतिपादन आदिती तटकरे यांनी केले.विरोधक कितीही आटापिटा करत असले तरी आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेवर निर्विवादपणे राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येईल असा ठाम विश्वास त्यांनी आयोजित गावभेटी दरम्यान व्यक्त केला.ग्रामस्थानी नव्याने मागणी केलेल्या विकास कामांना आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषद पांगलोली गट क्रमांक ५० मधून उमेदवार अभिजित विचारे आणि पंचायत समिती सालविंडे गण क्रमांक ९९ मधून उमेदवार माजी जिल्हा परिषद सभापती बबन मनवे यांच्या प्रचारार्थ आदिती तटकरे यांनी आडी,कोळे,पानवे,केलटे,घूम–रुद्रवट,नेवरूळ,सालविंडे,सांगवड,ठाकरोली,कोकबन,भाबट,खारगाव खुर्द आदी गावांना भेटी देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.या वेळी त्यांच्यासोबत जिल्हा तालुका प्रमुख समीर बनकर,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,रियाजभाई फकी,मधुकर गायकर,रामदास रिकामे,राजेंद्र लटके,श्रीकांत बिरवाडकर,महेश पवार,नामदेव महाडिक,
प्रकाश जाधव,सोनल घोले,मीनाताई टिंगरे,वनिता खोत,रेश्मा कानसे,सतीश शिगवण,किरण पालांडे,सुनिल शेडगे,सतीश शिगवण,आदी पदाधिकारी कार्यकर्ते,ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आदिती तटकरे यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
