दर्यापूर (प्रतिनिधी )-
स्थानिक विनायक होमोओपॅथीक व आयुर्वेदिक क्लिनिक येथे स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ शाखा दर्यापूर व अचलपूर यांच्या संयुक्त विद्यामाने नुकतेचे पार पडले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी अचलपूर जिल्हाध्यक्ष अनंत दाभाडे, उदघाटक श्रीमती मंदाताई बळवंतभाऊ वानखडे तर प्रमुख अतिथी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष संजय सरवटकर उपस्थित होते. सर्वप्रथम आकास्मिक निधन झालेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना उपस्थित सर्व मान्यवरांनी व शिबिरार्थ्यांनी अजितदादांना भावपुर्ण श्रद्धाजंली वाहली. नंतर आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिरात नेत्र, तपासणी, संधीवात, मुतखडा व इतरही आजाराची तपासणी करण्यात आली. तसेच लाभार्थ्यांना अल्पदरात चष्मे देण्यात आले. या दिवशी आठवडी बाजार असल्याने असंख्य लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवीला असून शिबिराला डॉ. हितेंद्र म्हाला व डॉ. सौ. अर्चना हि. म्हाला यांच्या मार्गदर्शनात उत्तमरित्या शिबीर पार पडले. नेत्रतपासनी डॉ. अख्तर (अकोला ) यांनी केली. याप्रसंगी दर्यापूर अध्यक्ष विजय हरणे, संघटक, प्रकाश रहाटे, अचलपूर उपाध्यक्ष विजय ठाकरे व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
